Marathi

Tu Dhagdhagti Aag

अनन्या Ananya - Tu Dhagdhagti Aag Lyrics By 2022. Best Song Tu Dhagdhagti Aag From अनन्या Ananya Film Lyrics in Hindi & English Originally Released on YouTube. Tu Dhagdhagti Aag Song Sung By Popular Singer Vishal Dadlani, Music Composed By Samir Saptiskar, and Lyrics Of This Song Are Written By Abhishek Khankar. Tu Dhagdhagti Aag Full Song Lyrics अनन्या Ananya Movie By Vishal Dadlani. We Offer Amazing Songs Lyrics Only on WoLyrics.com

Tu Dhagdhagti Aag Song अनन्या Ananya Details

Vocal/Singer
Movie
Music Comsposer Samir Saptiskar
Lyricist Abhishek Khankar
YouTube video

Tu Dhagdhagti Aag Lyrics अनन्या Ananya | Vishal Dadlani

गीत : तू धगधगती आग

मुखडा :

ढगाआडल्या
सुर्यामधली
तू धगधगती आग..

इवल्या इवल्या
पंखांमधली
तूच नभाची जाग..

गरजणारा
बरसणारा
तूच राग मल्हार..

तू भरारी
तू उभारी
तूच तेज तर्रार..

तुफानी तू वादळापरी,
मर्दानी वीरांगना..

लाज कशाची आज ना तुला,
भीति कशाची सांग ना?

अंधारातल्या शोध वाटा
हो ठाई तुझ्या..

ही दुनिया पहा झुके
हो पायी तुझ्या..

अंतरा १ :

थोडा धीर घे
गाठीशी तुझ्या

घे त्या वेदना
पाठीशी तुझ्या

आभाळी.. उडू दे..
साऱ्या भावनांना..

ढगाला.. भिडू दे..
आता पावलांना..

घुमू दे फिरू दे वाऱ्याला धरू दे
साऱ्या भावनांना..

थैमान करू दे उधाण भरू दे
आता पावलांना

उसळू दे जरा आज लाटा
हो ठाई तुझ्या..

ही दुनिया पहा झुके
हो पायी तुझ्या..

अंतरा २ :

जागल्या पाकळ्या
मनी तुझ्या

जाहल्या ह्या दिशा
जणू भुजा

रंग आले नवे
नभी पहा

त्यासवे तू पुन्हा
उभी रहा

कस्तुरी जाहली ही हवा
श्वास घे ना पुन्हा तू नवा

आभाळी.. उडू दे..
साऱ्या भावनांना..

ढगाला.. भिडू दे..
आता पावलांना..

घुमू दे फिरू दे वाऱ्याला धरू दे
साऱ्या भावनांना..

थैमान करू दे उधाण भरू दे
आता पावलांना

अंधारातल्या शोध आता
हो ठाई तुझ्या..

ही दुनिया पहा झुके
हो पायी तुझ्या..

अंतरा ३ :

मातीतला आकार तू
हुंकार तू शृंगार तू
रण-अंगणी ललकार तू
स्वीकार तू प्रतिकार तू

ह्या चांदव्याची कोर तू
तू ही निशा अन भोर तू
सौदामिनी घनघोर तू
वाहती नदी पुरजोर तू

तू जन्मदा संहार तू
तू लक्षुमी तू शारदा दुर्गाच तू

ना थांबता कर वार तू
कर सामना अन दे लढा चल आज तू

अंधारातल्या शोध वाटा
हो ठाई तुझ्या..

Check Also
Close
Back to top button